दिवाळीच्या दुसर् या दिवशी सोमवारी, 13 नोव्हेंबररोजी सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. धनतेरस आणि दिवाळीमुळे देशात सोन्याची मागणी वाढली होती, त्यामुळे दरात किंचित वाढ झाली होती. आज वायदा व्यवहारात सोन्याचा भाव 93 रुपयांनी घसरून 59,659 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजमध्ये डिसेंबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा करार 93 रुपये म्हणजेच 0.16 टक्क्यांनी घसरून 59,659 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या दरात घसरण होण्यामागे सहभागींनी आपल्या पोझिशनमध्ये केलेली कपात कारणीभूत आहे. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा भाव 0.17 टक्क्यांनी घसरून 1,940.90 डॉलर प्रति औंस झाला.

आज चांदीचा भाव काय आहे?
आज वायदा व्यवहारात चांदीचा भाव 727 रुपयांनी घसरून 69,305 रुपये प्रति किलो ग्रॅम झाला. मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर डिसेंबर डिलिव्हरीसाठी चांदीचा करार ७२७ रुपये म्हणजेच १.०४ टक्क्यांनी घसरून ६९,३०५ रुपये प्रति किलोझाला असून त्याची उलाढाल २५,३३७ लॉटची आहे.
न्यूयॉर्कमध्ये चांदीचा भाव 0.92 टक्क्यांनी घसरून 22.08 डॉलर प्रति औंस झाला आहे.
सोन्याची स्पॉट किंमत काय आहे?
गुड रिटर्न्सनुसार, बातमी लिहिली जाईपर्यंत वेगवेगळ्या शहरांमधील सोन्याचे स्पॉट प्राइस खालीलप्रमाणे आहेत.
दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.