नागपूर : पुणे Pune शहर वाऱ्याच्या वेगाने पसरते आहे. शैक्षणिक राजधानीमध्ये उद्योग व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर आहेत आणि वाढत देखील आहेत. दरम्यान शहराचा विस्तार पाहता वेगवान कनेक्टिविटी असणे देखील आवश्यक आहे. पुण्यात पुणे मेट्रोमुळे Pune Metro अनेक प्रमुख मार्गांनी हळू हळू मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली आहे. मेट्रोचा अधिक अधिक वापर पुणेकरांनी करावा असे आवाहन पुणे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ज्यामुळे वाहतूक कोंडीच्या विळख्यातून पुणे बाहेर पडू शकते.
सातत्याने वाहतूक कोंडी होणार पुण्यातील आणखीन एक भाग म्हणजे स्वारगेट ते कात्रजचा रास्ता… दरम्यान पुणे शहरातील स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रस्तावित असून या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.
स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेल्यानंतर राज्य शासन त्याचा पाठपुरावा करून मंजूरी घेईल. खडकवासला ते खडारी हा २५.६५ किमीच्या मेट्रो मार्गाचा डीपीआर राज्य शासनाकडे सादर झालेला आहे. तो देखील मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र शासनाकडे पाठवला जाईल. या मेट्रोचे शेवटचे स्टेशन खडकवासला धरणापर्यंत असावे अशी मागणी केलेली आहे. त्याची देखील संयुक्त पाहणी झालेली आहे. तो प्रस्ताव फिजिबिलिटी रिपोर्टसह शासनाकडे सादर केलेला असून राज्य शासन त्यावर निर्णय घेईल, असे मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.