महाराष्ट्र : महाराष्ट्रात सध्या उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशातच एक दिलासादायक बातमी समोर येते आहे. आजपासून राज्यात पुढील 3 ते 4 दिवस बहुतांशी भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने Weather Forecast वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार नगर, पुणे, सातारा, नांदेड, लातूर, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आजपासून मंगळवारपर्यंत राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याचेही भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे आणि रायगडच्या अनेक भागात येत्या रविवारपासून पाऊस आणि वादळाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान, सामान्यांना हा पाऊस दिलासा देत असला तरी या अवकाळी पाऊसामुळे बळीराजा संकटात आल्याचं पहायला मिळते आहे. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत असल्याचे सांगतले जाते आहे.