जयपूर : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे Rashtriya Rajput Karni Sena प्रदेशाध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी Sukhdev Singh Gogamedi यांची मंगळवारी जयपूरमध्ये गोळ्या झाडून हत्या Murder करण्यात आली आहे. श्यामनगर परिसरातील त्यांच्या घराबाहेर काही अज्ञात ांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. सुखदेव सिंह यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुखदेव सिंग गोगामेडी यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या.
जयपूरचे पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखदेव सिंग गोगामेडी हे मंगळवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास श्याम नगर जनपथ येथील घराबाहेर उभे होते. तेवढ्यात स्कूटरवर दोन दरोडेखोर आले. हल्लेखोरांनी गोगामेडी यांच्यावर गोळीबार केला.गोळी लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या निधनावर भाजप नेते गजेंद्रसिंह शेखावत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया एक्सवर लिहिले की, “श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी जी यांच्या हत्येच्या बातमीने मला धक्का बसला आहे. या संदर्भात पोलिस आयुक्तांकडून माहिती घेण्यात आली असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
समाजबांधवांनी शांतता आणि संयम ठेवावा. भाजप सरकार ची शपथ घेताच राज्य गुन्हेगारीमुक्त करणे हे आमचे प्राधान्य आहे. ईश्वर गोगामेडीजींच्या आत्म्याला शांती देवो. कुटुंबातील सदस्य, समर्थक व हितचिंतकांचे सहकार्य लाभले पाहिजे.
कोण आहेत सुखदेव सिंह गोगामेडी ?
सुखदेव सिंह आधी राष्ट्रीय करणी सेनेमध्ये होते. करणी सेनेमध्ये मतभेद झाल्यानंतर त्यांनी स्वत:ची स्वतंत्र संघटना स्थापन केली. श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना हि संघटना त्यांनी स्थापन केली होती. या संघटनेचे अध्यक्ष होते.