नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत उत्तर देत आहेत.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ” जेव्हा राष्ट्रपती या नवीन संसद भवनात आम्हाला संबोधित करण्यासाठी आले आणि त्यांनी सेनगोल आणि संपूर्ण मिरवणुकीचे अभिमानाने आणि सन्मानाने नेतृत्व केले, तेव्हा आम्ही सर्व जण त्यांचे अनुसरण करत होतो. नव्या सभागृहातील ही नवी परंपरा जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याच्या त्या पवित्र क्षणाचे प्रतिबिंब बनते, तेव्हा लोकशाहीची प्रतिष्ठा अनेक पटींनी वाढते.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ” आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ दूर नाही. अवघे १००-१२५ दिवस शिल्लक आहेत. एनडीए 400 चा टप्पा पार करेल आणि भाजपला 370 जागा नक्कीच मिळतील. तिसरी टर्म खूप मोठी निर्णय घेणारी असेल. असे पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या कार्यप्रणालीवर पंतप्रधानांची जहरी टीका
पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसची मानसिकता, ज्याने देशाचे खूप नुकसान केले आहे. कॉंग्रेसचा देशाच्या सत्तेवर कधीच विश्वास नव्हता, त्यांनी स्वत:ला राज्यकर्ते मानले आणि जनतेला कमी लेखले. 10 वर्षांत 40 हजार किलोमीटर रेल्वे रुळांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. देश कॉंग्रेसच्या वेगाने चालला असता तर हे काम करायला ८० वर्षे लागली असती. अशी टीका पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.