डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीमध्ये गुरुवारी केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. यानंतर भीषण आगीचे घटना घडली होती. दरम्यान याप्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली असून हा बॉयलरचा स्फोट नाही तर रिऍक्टरमुळे झालेला स्फोट होता असे स्पष्टीकरण अग्निशमन दलाकडून देण्यात आला आहे.
गुरुवारी दुपारी डोंबिवली एमआयडीसीतील अनुदान केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. यानंतर अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण आणले तर कुलिंगचे काम संपल्यानंतर आज सकाळी घटनास्थळाचे परीक्षण करण्यात आल्यानंतर एक मोठी अपडेट अग्निशमन दलाने दिली आहे. सुरुवातीला हा स्फोट हा बॉयलरमुळे झाला असल्याचे सांगण्यात येत होतं. परंतु या कंपनीमध्ये बॉयलरच अस्तित्वात नसून हा स्फोट रिऍक्टरमुळे झाला असल्याचं अग्निशमन दलाने स्पष्ट केलं आहे.
घटनास्थळी अग्निशमन दलाला रिऍक्टरचा पाया आणि तुकडे आढळून आले आहेत. रिऍक्टरमध्ये तापमान वाढले आणि तांत्रिक बिघाड झाल्यानंतर हा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की कंपनीमध्ये आग सर्व दूर पसरली आणि त्यानंतर या आगीचा फटका जवळ असणाऱ्या कंपन्यांना देखील बसला आहे.