भंडारा : भंडारा जिल्ह्यातील तुमसर या तालुक्याच्या नाकाडोंगरी येथे लावणी नृत्यांगणावर पैसे उधळल्याचा एक व्हिडीओ Video Viral चांगलाच व्हिरल झाला आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मोहाडी पंचायत समितीचे सभापती रितेश वासनिक हे या व्हिडीओमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणाची वक्तव्य परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे Neelam Gorhe यांनी गंभीर दखल घेतली होती. त्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे पुढे गेल्यावर या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मोहाडी पंचायत समितीचे सभापती रितेश वासनिक यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोबरवाही इथं मंडई निमित्त आयोजित कार्यक्रमात अश्लील डान्स करण्यात आला होता. हा कार्यक्रम 17 नोव्हेंबरला पार पडला असून त्यात अश्लील व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल Bhandara Dance Viral Video करण्यात आला आणि त्यानंतर हा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाला होता.
हे वाचलेत का ? महत्वाची बातमी : सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची ‘Set Exam’ आता वर्षातून दोनदा होणार !
या प्रकरणी गोबरवाही पोलिसांनी नागपूरच्या आरके डान्स हंगामा ग्रुपच्या तिघांसह कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आणि अश्लील व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल करणाऱ्या पाच जणांविरुद्ध कलम 354, 354 ब, 294, 509 भांदवी अन्वये गुन्हा दाखल केला होता. तसेच या कार्यक्रमात हजर असतानाही कर्तव्यात हलगर्जी करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून अधिक तपास भंडाऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बागुल करीत होते. आता या प्रकरणाच्या तपास पुढे जाऊन ही कारवाई करण्यात आली आहे.