गोवा : गोव्याच्या हॉटेलमध्ये झालेल्या चार वर्षाच्या मुलाच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली आहे. कर्नाटकातील उच्चशिक्षित महिलेने घटस्फोट झालेल्या नवऱ्याला मुलाची भेट घेता येऊ नये म्हणून थेट मुलाची हत्या केली आहे.
पेशाने एआय एक्सपर्ट असलेली आरोपी आई सूचना सेठ सहा जानेवारीला आपल्या मुलाला गोव्याला घेऊन गेली होती. यावेळी हॉटेलमध्ये ती आपल्या मुलासोबत दोन दिवस राहिली. परंतु चेकआउट करत असताना तिने गोव्यातून कर्नाटकामध्ये हॉटेल कर्मचाऱ्यांना कॅब बुक करायला लावली. जात असताना तिच्यासोबत तिचा लहान मुलगा दिसला नाही. म्हणून हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यानंतर तिने राहत असलेली रूम साफ करत असताना रूममध्ये रक्ताचे डाग देखील आढळले होते. यावरून हॉटेल कर्मचाऱ्यांनीच पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनेचा उलगडा झाला आहे.

या महिलेचे लग्न 2010 मध्ये झाले होते. तर 2019 मध्ये या दाम्पत्याला मुलगा झाला होता. त्यानंतर 2020 मध्ये तिचा पतीशी घटस्फोट झाला. याबद्दल कोर्टाने तिच्या पतीला मुलाला भेटण्यासाठी दिलेली सवलत तिला अमान्य होती. या शुल्लक कारणासाठी तिने तिच्या मुलाची हत्या केली आहे.
दरम्यान ज्या हॉटेलच्या रूममध्ये या महिलेने आपल्या मुलाची श्वास घोटून हत्या केली. तिथे रक्ताचे डाग आढळले आहेत. पोलिसांनी पंचनामा करते वेळी एक चिठ्ठी देखील या हॉटेल रूममध्ये आढळून आली आहे. ज्यावर तिने न्यायालयाचा निर्णय सहन करू शकत नाही असे लिहिले आहे. हा मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे.