सोलापूर : सोलापुरातील उजनी धरणामध्ये प्रवासी बोट उलटली असून NDRF ला अद्यापही या बोटीतून प्रवास करणाऱ्या सहा प्रवाशांना शोधण्यात यश आले नाही. 17 तासानंतर केवळ ही बोट सापडली आहे.
https://twitter.com/mayuganapatye/status/1793143924955234745
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील कुगाव ते इंदापूर अशी ही बोट वाहतूक सुरू आहे. दरम्यान सहा प्रवासी या बोटीतून प्रवास करत होते. यामध्ये गोकुळ जाधव वय वर्ष 30, कोमल जाधव वय वर्ष 25, शुभम जाधव वय दीड वर्षे, माही जाधव वय तीन वर्षे, अनुराग अवघडे वय 35 वर्षे, गौरव डोंगरे वय १६ वर्षे, अशी या सहा जणांची नावे असून यांना शोधण्यात मात्र अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जाते आहे.
घटनेला आता 17 तास उलटून गेली आहेत काल संध्याकाळी अचानक वादळी वारे सुरू झाले यावेळी ही बोट पाण्यात उलटली. दरम्यान या बोटीमध्ये कुगावातील एक युवक, बोट चालक आणि राहुल डोंगरे हे पोलीस निरीक्षक देखील होते. यावेळी डोंगरे यांनी पाण्यात उडी मारून प्रवाहाचा काठ गाठला आणि स्थानिकांना घडल्या घटनेची माहिती दिली. दरम्यान सध्या युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू असून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.