लखनऊ : अयोध्येत Ayodhya बनत असलेल्या भव्य राम मंदिराच्या Shriram Temple उद्घाटनाची तारीख ठरली आहे. पुढील वर्षी २२ जानेवारी २०२४ रोजी मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा केली जाईल. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra modi सामील होणार आहेत. प्राणप्रतिष्ठापणा होण्याच्या एक आठवडा आधीपासूनच पूजा-अर्चा सुरू होणार आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर हा आज भारतीयांच्या हृदयाच्या जवळ असणारा विषय आहे. प्रभू श्रीरामाचे मंदिर पुन्हा एकदा भारताच्या प्रतिष्ठेत भर घालणार आहे. लवकरच मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी उत्सुकता असतानाच अयोध्येमध्ये योगी सरकार आणखीनही उपक्रमांच आयोजन करते आहे.
नव्या पिढीला आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध करण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल आहे. लखनऊ मधील उत्तर प्रदेश राज्य ललित कला अकादमीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील कलावंत कलाकृती तयार करण्याचे काम करणार आहेत. अयोध्येतील प्राणअभिषेकाची घटना लक्षात घेऊन सांस्कृतिक विभागाने तब्बल 100 कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा केली आहे.
रामोत्सवाअंतर्गत स्पर्धा आणि शिल्प चित्रकलेच्या माध्यमातून युवकांना प्रेरित करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये स्पर्धेवर चार कोटी तर शिल्प चित्रकलेवर अडीच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. रामायणातील विविध प्रसंगांची तरुणाईला माहिती व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला असून भव्य दिव्य करण्यासाठी योगी सरकार सज्ज आहे.