नवी दिल्ली : कुस्तीपटू साक्षी मलिकने Wrestler Sakshi Malik केली निवृत्तीची घोषणा Retirement announcementभारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली आहे. साक्षी मलिकच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. पत्रकार परिषदेत कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला. देशवासियांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. साक्षीने नव्या अध्यक्षनिवडीवर नाराजी व्यक्त केली आहे. पत्रकार परिषदे दरम्यान साक्षी मलिक भावूक झाली आणि रडत रडत पत्रकार परिषद मध्येच सोडून गेली. पत्रकार परिषदेतून बाहेर पडण्यापूर्वी त्यांनी सरकार आणि भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकांवर सडकून टीका केली.
साक्षी म्हणाली की, मी देशासाठी जिंकलेले सर्व पुरस्कार तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जिंकले आहेत, मी तुम्हा सर्व देशवासीयांची सदैव आभारी राहीन. कुस्तीला अलविदा. हे धाडस निर्माण करण्यासाठी आणि ही लढाई लढण्यासाठी अनेक वर्षे लागली. कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांचा उजवा हात झाला आहे, हे तुम्हा सर्वांना माहिती आहेच. सरकारने जे सांगितले ते पूर्ण झाले नाही. आम्हाला महिला अध्यक्ष हवा होता. जे सरकारने मान्य केले नाही.
भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षपदाच्या निवडीनंतर कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली आहे. साक्षी मलिकच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. पत्रकार परिषदेत कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला. देशवासियांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. साक्षीने नव्या अध्यक्षनिवडीवर नाराजी व्यक्त केली आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली की, आम्ही 40 दिवस रस्त्यावर झोपलो आणि देशाच्या अनेक भागातून अनेक लोक आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले. ब्रिजभूषण सिंग यांचा बिझनेस पार्टनर आणि जवळचा सहकारी या फेडरेशनमध्ये राहिला तर मी माझी कुस्ती सोडून देते… आमचा लढा सुरूच राहणार आहे. “
नेमकं प्रकरण काय ?
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटूच्या नावाने बनावट अश्लील व्हिडिओ पोस्ट करून आपली बदनामी केल्याचा आरोप केला आहे. साक्षीने इंटरनेट मीडियावर एक व्हिडिओ टाकून म्हटले आहे की, कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्याविरोधात न्यायाची लढाई सुरू आहे.