विश्वचषक 2023 : मध्ये टीम इंडियाचा आगामी सामना बांगलादेश (IND vs BAN) विरुद्ध रंगणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया पुण्यात पोहोचली आहे. विराट कोहली, रोहित शर्मासह इतर खेळाडूंना पाहण्यासाठी विमानतळावर मोठी गर्दी झाली होती. वर्ल्ड कपमध्ये भारताचा आगामी सामना 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेश विरोधात रंगणार आहे.
https://x.com/ANI/status/1713612784968335487?s=20
विश्वचषक 2023 मध्ये आतापर्यंत टीम इंडियाची विजयी वाटचाल पाहायला मिळाली आहे. भारताने विश्वचषकात आतापर्यंत तीन सामने खेळले असून तिनही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारताचा शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध झाला. हा सामना अहमदाबादमध्ये खेळवण्यात आला. आता पुढचा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे.
https://x.com/Delphy06/status/1713554602761519270?s=20
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी 1.30 वाजता नाणेफेक होईल.
भारतीय क्रिकेट संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव.
बांग्लादेश क्रिकेट संघ
लिटन दास, तनजीद हसन, नजमुल हुसेन शांतो, मेहिदी हसन मिराज, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, तस्किन अहमद, शॉरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, तनजीम हसन, शाकिब, शाकब नसूम अहमद, महेदी हसन.