ICC World Cup 2023 च्या 2023 व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर दोन्ही संघांमध्ये हा सामना खेळला जात आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी कांगारू संघाला प्रत्येक परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे.
बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाला अखेरच्या सामन्यात भारताकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध च्या विजयी ट्रॅकवर पुनरागमन करण्याचा संघाचा मानस आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाक प्लेइंग ११
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, मिशेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा, जोश हेजलवूड.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : अब्दुल शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उस्मा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हारिस रऊफ.