ICC ODI World Cup 2023 : आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. सामना सुरु असून आतापर्यंत १२ ओव्हर झाल्या आहेत. आतापर्यंत भारताचे ३ गडी बाद झाले आहेत यामध्ये शुभमं गिल, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर हे खेळाडूं पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. सध्या विराट कोहली आणि के एल राहुल मैदानावर भारताचे नेतृत्व करत आहेत .
हे वाचलेत का ? World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला; भारताविरुद्ध पहिले बॉलिंग करणार, वाचा प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण ?
या सामन्यात २००३ च्या विश्वचषकानंतर अंतिम फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. अशा परिस्थितीत २० वर्षांच्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने भारतीय संघ आपले १०० टक्के देण्याच्या इराद्याने अहमदाबादच्या मैदानात उताराला आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघाने आतापर्यंत एकूण १९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 11 सामने जिंकले आहेत, मात्र 8 सामन्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या मैदानावर रोहित ब्रिगेडचे वर्चस्व नाही.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकूण 6 वनडे सामने खेळले आहेत, त्यापैकी कांगारू संघाने 4 सामने जिंकले आहेत, तर 2 सामने गमावले आहेत. ऑस्ट्रेलियाला १९८६ आणि २०११ मध्ये भारताविरुद्ध या मैदानावर पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर या मैदानावर कांगारू संघाने भारताव्यतिरिक्त अन्य कोणत्याही संघासोबत एकूण 3 वनडे सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी विजय मिळवला आहे.
भारत – (19 वनडे) – 11 वेळा (विजयी) – 8 सामने (पराभव)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – १९८४ – ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – १९८६ – भारत ५२ धावांनी विजयी
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 2011 : भारत 5 गडी राखून विजयी
भारत सलग चौथ्यांदा अंतिम सामना खेळणार आहे.
भारतीय संघाने सलग चौथ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिजला पराभूत करत पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले होते. त्यावेळी सौरव गांगुली टीम इंडियाचा कर्णधार होता. त्यानंतर २०११ मध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करून दुसऱ्यांदा विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते.
अशा तऱ्हेने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ तिसऱ्यांदा जेतेपद पटकावेल, अशी अपेक्षा आहे.