मुंबई : शिवसेना Shivsena आमदार अपात्रता सुनावणीत मुदत वाढवून देण्याच्या विधिमंडळाच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने Supreme Court मुदत वाढ दिली आहे. आहे. अपात्रता सुनावणीसाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता शिंदे सरकारचे पुढे भवितव्य कसे राहणार हे लवकरच स्पष्ट होण्याचे संकेत आहेत असं असताना विरोधक सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्या पदाला धोका असल्याचं बोलत आहेत. यावर ‘अजूनही परत या आणि उद्धव ठाकरे यांच्या समोर शरणागती पत्करा’ असा सल्ला परभणीचे संजय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
परभणीचे खासदार संजय जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की, ” अजूनही उद्धव ठाकरे यांच्यापुढे शरणागती पत्करावी, ते माफ करू शकतील. शरण से मरण टल सकता है ! असा रामायणातील पंक्तीचा उपयोग करून जाधव यांनी शिंदे यांना मैत्रीपूर्ण सल्ला दिला आहे. जाधव म्हणाले कि, सर्वोच्च न्यायालयाने व्हीप हा सुनील प्रभूंचा असल्याचं सांगितल्यानंतर हे लोक म्हणतात, आम्हाला व्हीप मिळालाच नाही. जर व्हीप मिळाला नव्हता तर राज्यपालांकडे कसे गेलात, सरकार अल्पमतात आल्याचं सांगायला गेला होता का, असा सवाल यावेळी खासदार संजय जाधव यांनी उपस्थित केलाय. भाजपने शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. मग लोकसभेनंतर त्यांच्या दृष्टीने एकनाथ शिंदेंना संपवणे किती जड आहे, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला आहे.
अपात्रता सुनावणीसाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशातच भाजपमध्ये सामील झाल्यानंतर मुख्यमंत्री पदावर वर्णी लागली. परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील सत्तेत सभागी झाल्या नंतर अनेक चर्चाना उधाण आले आहे. लवकरच अजित पवार मुख्यमंत्री होणार अशा चर्चाना देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून हवा दिली जाते आहे. त्यामुळे आता आमदार अपात्रता निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.