क्रीडा : वर्ल्डकपनंतर आयसीसीने एक मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने क्रिकेटच्या नियमात बदल केला आहे. आता आयसीसीने गोलंदाजांसाठी देखील टाइम आउटचा नियम लागू केला आहे. यापूर्वी फक्त टाइम आउटचा नियम फलंदाजांसाठी होता. मात्र आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
हे वाचलेत का ? POLITICAL NEWS : पंतप्रधान मोदींवरील ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी : खासदार रविशंकर प्रसाद
नव्या नियमानुसार आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला याची काळजी घ्यावी लागेल की, एक ओव्हर संपल्यानंतर पुढचा गोलंदाज 60 सेकंदात म्हणजेच एका मिनिटांत पुढील ओव्हर टाकण्यास तयार असला पाहिजे. जर असं झालं नाही तर मात्र संघाला पॅनल्टी दिली जाईल.
एका डावात तीन वेळा 60 सेंकदांची मर्यादा ओलांडल्यास क्षेत्ररक्षण, गोलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावांचा दंड सुनावण्यात येणार आहे. म्हणजेच प्रतिस्पर्धी संघाला (फलंदाजी करणारा संघ) पाच धावा दिल्या जातील. हा नियम सध्या पुरुष क्रिकेटमध्ये वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये लागू होणार आहे.