नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड टस्सल पाहायला मिळाली आहे. प्रचारादरम्यान अत्यंत सामान्य वाटणारा उमेदवार देखील हजारोंच्या फरकानं निवडून आलाय. पण काही असे उमेदवार देखील आहेत ज्यांचे विजयी झाल्याचे प्राप्त मतांचे आकडे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
एकतर्फी विजय खेचून आणणं काय असतं हे तुम्हाला या उदाहरणातून नक्कीच लक्षात येईल. एकंदरीतच यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीतून मतदाराने अधिक काम दाखवा आणि मग मत मागा हेच एका अर्थानं राजकारण्यांना ठणकावून सांगितल आहे. पण भारताच्या इतिहासामधील हे पाच नेते आणि त्यांचे प्राप्त मत वाचाच.
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Home Minister Amit Shah यांनी गांधीनगरमध्ये 7 लाख 44 हजार मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी सोनम पटेल यांचा पराभव केला.
2. इंदापूरचे विद्यमान खासदार शंकर ललवाणी यांनी 10 लाख 8 हजार 77 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी बहुजन समाजवादी पार्टीच्या संजय सोळंकी यांचा पराभव केला.
3. भाजपचे सीआर पाटील यांनी देखील गुजरात मधील नवसारीमधून 7 लाख 73 हजार मतं मिळवली. त्यांनी काँग्रेसच्या नैशदभाई देसाईंना पराभूत केले.
४. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी विदिशा मधून ८ लाख 21 हजार मतांच्या फरकानं विजय एकतर्फी खेचला आहे.
५. आसाममधील दुबरी येथून काँग्रेसच्या रखीबुल हुसेन यांनी 10 लाख 12 हजार मतांनी विजय मिळवला आहे.
या सर्व दिग्गजांच्या नावांमध्ये महाराष्ट्रातील देखील एक नाव अस आहे ज्यांनी 2014 च्या निवडणुकीमध्ये तब्बल ६ लाख 96 हजार मतांनी एकतर्फी विजय खेचून आणला होता. या उमेदवारांचं नाव आहे भाजपच्या प्रीतम मुंडे !