मुंबई : काँग्रेसमध्ये आज सकाळीच मोठे वादळ आल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपची वाट धरली आहे, अशी माहिती मिळते आहे.
दरम्यान माध्यमांनी याविषयी अशोक चव्हाण यांना विचारले असता त्यांनी राहुल नार्वेकर यांची घेतलेली भेट ही केवळ त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी घेतली होती असं त्यांनी म्हटलं आहे. तथापि आता त्यांचा राजीनाम्याचा पत्रव्यवहार देखील समोर येतो आहे.
याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, ” भाजपसोबत अनेक पक्षातील बडे नेते येण्यासाठी इच्छुक आहेत. विशेषतः काँग्रेस मधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला नेते कंटाळले आहेत. काँग्रेसमधील मुस्कटदाबी आणि मोदींच्या नेतृत्वातील भारताची प्रगती पाहता अनेक नेत्यांना वाटतं की मुख्य प्रवाहात यायला हवं ! त्यामुळे आमच्या कोण कोण संपर्कात आहेत. भाजपमध्ये कोण कोण येणार ? याबाबत मी इतकच सांगेल आगे आगे देखिये होता है क्या….! दरम्यान अशोक चव्हाण यांचं राजीनामा पत्रव्यवहार पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा इशारा अशोक चव्हाण यांच्या दिशेनेच होता असं म्हटलं जातंय.