बारामती : बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध विजय शिवतारे असा सामना देखील या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. खरंतर याचा फटका सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे यांना देखील बसणारच आहे. विजय शिवतारे यांनी आता ही निवडणूक लढवणारच असा ठाम निर्णय घेतला आहे.
काय म्हणाले विजय शिवतारे
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीमधून निवडणूक लढवणारच असं ठाम निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, ” ज्यांना सुप्रिया सुळे , सुनेत्रा पवार यांना मतदान करायचं नाही त्यांनी काय करायचं ? त्या लोकांना लोकशाहीतील हक्क बजावण्यासाठी मी बारामती निवडणूक लढवणार असा एल्गार त्यांनी पुकारला आहे. तसेच ते म्हणाले की, ” मला बंडखोर म्हणू नका, पवार कुटुंबाला अनेक लोक कंटाळले आहेत. अजित पवार ही जागा जिंकू शकत नाही, हे त्रिवार सत्य आहे. मग ती जागा जिंकणारच नसतील तर मी जे पवार कुटुंबाच्या विरोधात आहेत त्यांचे नेतृत्व करण्याची संधी मिळत असेल तर का करू नये ?” असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.
” अजित काम करतो पण या सगळ्याचा पाया शरदने घातलाय..! ” शरद पवारांच्या बहिण सरोज पाटील यांनी स्पष्टच सांगितले; भाजपवर गंभीर आरोप…
यावेळी शिवतारेंनी पुन्हा एकदा अजित पवारांवर कटू शब्दात प्रहार केला आहे. ते म्हणाले की, ” वैयक्तिकपणे मी अजित पवारांना माफ केले आहे. पण अजितदादांची गुर्मी जाणार नाही. बारामतीत फक्त पवारच का ? आणखी कोणी नाही का ? प्रस्थापित घराणे शाही विरोधात ही लढाई असून त्यासाठी मी उभा आहे. ” असं शिवतारे म्हणाले आहेत.
एकंदरीतच या तिहेरी लढतीमध्ये मोठा फटका नेमका कुणाला बसतो हे येणारा काळ लवकरच स्पष्ट करेल.