मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस बाबत दिलेला निर्वाळा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी ढवळाढवळ करणारा ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह आता अजित पवार यांचे असणार आहे. यावरून संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद पडताना दिसून येत आहेत.
दरम्यान, मुंबईतील राष्ट्रवादी भवन समोर बॅनरबाजी करण्यात आली आहे. यावर ” साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण…!”, ” चिन्ह तुम्हारा बाप हमारा…” आणि ” जीत तो आज भी हमारी…!” असं या बॅनरवर लिहिले आहे.
या निर्णयाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वातावरण बिघडले आहे. अशातच आता या बॅनरबाजीने महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतला आहे.
BIG NEWS : शरद पवारांचं ठरलं ! हे असणार पक्षाचं नाव आणि चिन्ह, वाचा सविस्तर