मुंबई : लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत तसे पक्षाचे प्रमुख नेते एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. एकीकडे भाजपच्या नेत्याने थेट शाहू छत्रपतींना खरे वारसदार आहात का ? असा सवाल केला तर आता संजय राऊत Sanjay Raut यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्यावर गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून कोट्यावधींचा निधी घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे.
आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले की, ” कोण चिकन खातं, कोण खात नाही.. हा काय प्रचाराचा मुद्दा आहे का ? निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून भाजपने साडेपाचशे कोटी निधी घेतला असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच भ्रष्टाचाराच शेण खाण्यापेक्षा मटन खाणं चांगल आहे. असेही संजय राऊत म्हणाले आहेत. मोदी चेहरा की मुखवटा हे देश ठरवेल. असं संजय राऊत म्हणाले आहेत.
तसेच मोदींचे नाणे घासून पुसून गुळगुळीत झाले आहे. मोदी आता बाजारात चालत नाही. बावनकुळे हा कालबाह्य झालेला ढबू पैसा आहे. श्रावणात मटन हा काय प्रचाराचा मुद्दा आहे का ? प्रचाराचा स्तर एवढा खाली आणत असतील तर त्यांना पराभवाची भीती आहे अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.
यावर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बोलावं, उत्तर द्यावं, असं देखील म्हटल आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राऊत यांच्या या आरोपावर काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.