महाराष्ट्र : राज्यसभेसाठी भाजपने आपल्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना महाराष्ट्र राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पुण्यातून माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नांदेड मधून अशोक चव्हाण आणि डॉक्टर अजित गोपछडे हे दोन नेते राज्यसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.
कोण आहेत डॉक्टर अजित गोपछडे
डॉक्टर अजित गोधडे हे मूळ नांदेडचे असून ते कार सेवक आहेत सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष पद त्यांच्याकडे आहे.
कोण आहेत अशोक चव्हाण
सोमवारी माझी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा अनुभव पाहता ते भाजपकडून नांदेड मधून निवडणूक लढवणार आहेत
कोण आहेत मेधा कुलकर्णी
मेधा कुलकर्णी या भाजपच्या माजी आमदार आहेत कोथरूड मधून चंद्रकांत पाटील यांना आमदारकीसाठी उमेदवारी दिल्यामुळे त्या पक्षावर नाराज होत्या. अनेक वेळा त्यांनी नाराजी व्यक्त देखील केली आहे. तर काही दिवसांपूर्वी त्या मनसेमध्ये प्रवेश करणार अशाच चर्चा देखील सुरू होत्या. दरम्यान पक्षाने आता त्यांची नाराजी दूर केली असून पुण्यातून त्या निवडणूक लढवणार आहेत.
Medha Kulkarni : भाजपची राज्यसभेसाठी पुण्यातून माजी आमदार मेधा कुलकर्णींना उमेदवारी जाहीर; लोकसभेसाठी ‘ या ‘ नावांची जोरदार चर्चा
दरम्यान मतांची जुळवा जुळवा झाली नसल्याकारणाने भाजप चौथा उमेदवार देणार नाही.