राजकीय : सध्या देशाच्या राजकारणात मोठ्या हालचाली हो आहेत. दरम्यान रिपब्लिकन पक्षाचे RPI चे नेते रामदास आठवले Ramdas Athawale यांनी मोठी घोषणा केली आहे. मंत्री रामदास आठवले यांनी लोकसभेच्या देशभरात 25 जागा लढवणार असल्याची घोषणा केली केल्यानंर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठींबा देणार आहे असे मंत्री रामदास आठवलेंनी स्पष्ट केले आहे. एन.डी.ए.चा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरं जाणार आहे.
देशभरात रिपब्लिकन पक्षाचे 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशात संघटन वाढत आहे असे रामदास आठवले म्हणाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरात रिपब्लिकन पक्ष लोकसभेच्या 25 जागा लढवणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.