नवी दिल्ली : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका Assembly Elections पार पडल्या आहेत. चारही राज्यांमध्ये भाजपने BJP विजयाचा गुलाल उधळला आहे. अशातच आता एकीकडे संसदेचे हिवाळी अधिवेशन Winter Session of Parliament सुरू झाले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांनी विरोधकांना तिखट सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “पराभवाचा राग संसदेत काढू नका ! शिवीगाळ निराशा आणि नकारात्मकता घमंडिया आघाडीसाठी हेडलाईन्स बनू शकतात पण जनतेच्या मनात स्थान देऊ शकत नाही. सुधरा नाहीतर जनताच तुम्हाला साफ करेल…!” अशा थेट भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.
चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या असून निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयी पताका हाती घेऊन विरोधकांवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाला संबोधित करताना म्हटले आहे की, ” निवडणुकीत ज्यांच्या पराभव झाला आहे, त्यांनी संसदेत त्यांचा राग दाखवू नका. पंतप्रधानांनी पुढे म्हटलं की, लोकशाहीमध्ये पक्ष आणि विपक्ष समान आहे. राजकारणात जनतेचं हित विसरू नका. हा निवडणुकीचा निकाल सकारात्मक पद्धतीने जनतेसमोर आणा, ‘काही लोक याला सरकार समर्थक सुशासन किंवा पारदर्शकता म्हणतात, हे देशात दिसून येत आहे. देशाने नकारात्मकता नाकारली आहे, लोकांच्या आकांक्षा बळकट करण्यासाठी लोकशाहीचं मंदिर महत्त्वाचं व्यासपीठ आहे. मी सर्व सदस्यांना विनंती करतो की, त्यांनी तयार राहून संसदेत मांडलेल्या विधेयकांवर सखोल चर्चा करावी.”
शिवीगाळ, निराशा आणि नकारात्मकता घमंडिया आघाडीसाठी हेडलाईन्स बनू शकतात, पण जनतेच्या मनात स्थान देऊ शकत नाही. पंतप्रधान मोदी यांनी विरोधाकांना इशारा देत म्हटलं आहे की, ”सुधरा, नाहीतर जनताच तुम्हांला साफ करेल. हा निकाल काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीसाठी मोठा धडा आहे.काही घराणेशाहीचे लोक एकत्र एका मंचावर आल्याने फक्त चांगला फोटो येऊ शकतो, पण देशाचा विश्वास जिंकू शकत नाही. देशातील जनतेचं मन जिंकण्यासाठी राष्ट्रसेवा करणं गरजेचं आहे.”
”देशातील वातावरणात हळूहळू थंडी वाढत असली तरी, राजकीय वातावरण मात्र तापलं आहे. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उत्साह दाखवणारे आणि देशाचे भविष्य निश्चित करणारे आहेत. चांगल्या जनादेशानंतर आम्ही संसदेच्या मंदिरात भेटत आहोत. मी सर्व खासदारांना सकारात्मक विचार घेऊन संसदेत यावे, असं आवाहन करतो. बाहेरच्या पराभवाचा राग संसदेत आणू नका. लोकशाहीच्या मंदिराला स्टेज बनवू नका. देशाला सकारात्मकतेचा संदेश द्या.” असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.