मुंबई : आज राष्ट्रवादी काँग्रेस NCP आमदार अपात्रता सुनावणी सुरू आहे या सुनावणी दरम्यान आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांची फेरसाक्ष घेण्यात आली यामध्ये अनिल पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकेकाळी असलेली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. फेरसाक्षीमध्ये अनिल पाटील म्हणाले कि, आपल्या मनात शरद पवार यांच्या विरोधात असंतोष होता.
फेरसक्ष सुरू असताना नेमकं काय अनिल पाटील म्हणाले की,
अनिल पाटील : आपल्या मनात शरद पवार यांच्या विरोधात असंतोष होता.
वकील : आपल्या मनात शरद पवार यांच्या विरोधात असंतोष होतात तर मग पवार यांनी पक्षाचा अध्यक्ष पद सोडून ये असं मत का होतं.
अनिल पाटील : पार्टी एकसंघ राहिली पाहिजे यासाठी राज्यातील नेत्यांच्या सोबत आम्ही सातत्याने चर्चा करायचो असंतोष कमी होण्याच्या दृष्टीने लोकांमध्ये पक्षाची इमेज खराब नको व्हायला म्हणून स्टेटमेंट दिले होते.
आजच्या सुनावणीमध्ये अनिल पाटील यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिली दरम्यान असंतोषाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कलह किती होता याबाबत अंदाज येतो.
Election Commission : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला रणधुमाळी ; ‘या’ प्रमुख नेत्यांचे भविष्य ठरणार