भंडारा : सध्या लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections 2024 पार्श्वभूमीवर सर्वच नेत्यांचे दौरे सुरू आहेत. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काल भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना रात्री त्यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
या अपघातातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा गाडीमध्ये कोणीही नव्हतं. सर्वजण खाली उतरलेले होते. या ट्रक चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असं प्राथमिक अंदाजात म्हटले आहे. परंतु हा केवळ अपघात नसून घातपात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
नाना पटोले म्हणाले की, आमच्या वाहनाला एका ट्रकने मुद्दाम धडक दिली. आम्ही यातून बचावलो सुखरूप राहिलो. पण गाडीचं बरंच नुकसान झालं. जनतेच्या आशीर्वादाने आम्ही सुखरूप राहिलो, कोणी काळजी करू नये असे पटोले यांनी म्हटले आहे.