मुंबई : जागा वाटपाच्या Mumbai Lok Sabha Elections तिढ्यावरून महाविकास आघाडीमध्ये अद्याप देखील अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. आताही अंतर्गत धुसफुस आहे. ती म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात…
नेमक प्रकरण काय ?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. हे आंदोलन ठाकरे यांच्यावरच्या नाराजीचे पडसाद होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण यांनी ठाकरे गटावर जबरदस्तीने आमची जागा बळकावली जात आहे असा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मुंबईच्या सहा जागांपैकी ठाकरे चार जागांवर उमेदवार देत असतील तर ईशान्य मुंबई ही जागा आमच्या हक्काची आहे. आमच्याकडे उमेदवार आहेत, आम्ही विनंती करून त्यांनी जागा सोडली तर ठीक नाहीतर मैत्रीपूर्ण लढतीसाठी विचार होऊ शकतो. शरद पवार, जयंत पाटील यांना विनंती आहे, मुंबईवर अन्याय होता कामा नये. ईशान्य मुंबईची जागा हवी अशी ठाम मागणी विद्या चव्हाण यांनी केली आहे.
एकंदरीतच ईशान्य मुंबईची जागा मिळाली नाही तरीही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं एका अर्थी विद्या चव्हाण यांनी घोषित केलं आहे. त्या म्हणाल्या की, ” आमच्याकडे उमेदवार नाहीत असं नाही. शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा आम्ही कमी नाही. भांडण, रस्सीखेच असे नाही. पण मुंबईतील हक्काची जागा आम्हाला मिळायला हवी असे विद्या चव्हाण म्हणाल्या आहेत.