जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मराठा आरक्षणाबाबतच्या Maratha Reservation बैठकीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग Video Conferencing द्वारे सहभाग घेतला होता. या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका ठाम असल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे.
आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ” या आंदोलनासाठी राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक येतील. या आंदोलनाला येणाऱ्या आंदोलकांना सरकारने अडवलं किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मुंबईत जाणार धान्य दूध बंद करून आमचा गॅस बंद केला तर लाकडं पेटवू असं देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत. 20 जानेवारीला मुंबईत आंदोलनाला जाण्यावर ठाम असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं असून आमचा आरक्षणासाठी लढा सुरू आहे आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही. त्यांनी आमच्या गाड्यांना डिझेल दिलं नाही, त्यांनी आम्हाला गॅस घेऊ दिला नाही, आमचं नेट बंद केलं, आम्हाला तेल-मीठ घ्यायचे दुकानं बंद केले, तरी आम्ही बिगर डिझेलवर गाड्या चालवण्याची तयारी केली आहे. हे कोणालाच माहिती नाही. तिथे बिगर डिझेलच्या गाड्या दिसतील. त्यांनी गॅस बंद केला तर आम्ही चूल पेटवू. पण तुमचं दूध बंद होणार. आमचा मायबाप मराठा शेतकरी तुम्हाला दूध देणार नाही. आम्ही इकडे त्याचं तूप, दही करु, पण तुम्हाला देणार नाही. तुम्ही बाजरी, गहू खायचेच नाहीत, ते सुद्धा देणार नाहीत. सोयाबीनही देणार नाही. आम्ही दाळी देणं बंद करु. तुम्ही त्या टोपल्याच्या काड्या काढायच्या आणि त्या खायच्या. तुम्हाला दुसरा चान्सच नाही. तुम्ही आम्हाला जसा त्रास द्याल, तसा तुम्हाला त्रास होईल”, असं देखील ते स्पष्टपणे म्हणाले.
येत्या 20 जानेवारीला जरांगे पाटील हे ओबीसीतून सरसकट आरक्षण मराठा समाजाला दिलं जावं या त्यांच्या ठाम मागणीसाठी मुंबईत आंदोलन करणार आहेत आता 20 जानेवारीला नेमकं काय होतं हे येणारा काळच सांगेल