जळगाव : महाराष्ट्रामध्ये सध्या उष्णतेने अक्षरशः कहरच केला आहे. खरंतर देशात परिस्थिती वेगळी नाही कारण राजस्थानचं तापमान सध्या 49 अंश सेल्सिअस Temperature पर्यंत पोहोचल आहे. तर जळगावमध्ये सध्या तापमान 47 अंश डिग्री सेल्सिअसवर आहे.
महाराष्ट्रात उकाड्याने लोक अक्षरशः हैराण झालेत. पण जळगाव मधली परिस्थिती जास्त बिकट होताना दिसून येते आहे. जळगावात उष्माघाताने sunstroke तब्बल 100 पेक्षा अधिक मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. तर काल एका ट्रकला उष्णतेने अचानक भीषण आग लागल्याचे घटना देखील घडली आहे.
दरम्यान शंभरहून अधिक मेंढ्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. त्याचबरोबर नुकसानग्रस्त मेंढपाळ कुटुंबीयांना मदत तिचे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आला आहे.
उष्माघातापासून बचाव कसा करावा
- उष्माघातामुळे जनावरे देखील दगावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे जनावरांना भरपूर पाणी पिण्यास ठेवावे.
- जनावरांच्या निवाऱ्याची जागा थंड ठेवण्यासाठी पाण्याची फवारणी करत रहावी.
- उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्यासाठी बाहेर नेण्यापेक्षा निवार्याच्या ठिकाणीच चाऱ्याची सोय करावी.
- वाहन चालवत असताना देखील गाडीमध्ये इंधन पूर्ण भरण्यापेक्षा टप्प्याटप्प्यांवर कामापुरते भरावे.
- बारा ते चारच्या दरम्यान प्रवास करावा लागत असल्यास वेळोवेळी वाहन थांबवावे.
- तुम्हाला जर उष्णतेच्या तडाख्यामध्ये अर्थात दुपारी बारा ते चारच्या दरम्यान घराबाहेर पडावे लागणार असेल तर छत्री, सनकोट, टोपी अशा साधनांचा उपयोग अवश्य करावा. त्याचबरोबर पिण्याचे पाणी सोबत हमखास ठेवावे. तहान लागली नाही तरीही पाणी पीत राहावे.