छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण या मुद्द्यावरून भाजपला मोठा फटका सहन करावा लागला आहे. तर आता मनोज जरांगे पाटील हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याची मोठी बातमी समोर येते आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण, सभा, पदयात्रा असे मार्ग निवडले आहेत. पण आता जर सरकारने आरक्षण दिले नाही तर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी देखील मनोज जरांगे पाटील यांनी करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे.
या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील हे स्वतः ही निवडणूक लढवणार नसून स्व-पक्ष तयार करणार की अपक्ष लढणार हे देखील निश्चित नसले तरीही आतापर्यंत 127 जागांचा सर्वे पूर्ण करण्यात आल्याची माहिती देखील मिळते आहे. दरम्यान आरक्षण दिले नाही तर मराठा, मुस्लिम, दलित आणि लिंगायत समाजाला एक साथ घेऊन ही निवडणूक लढवणार, मी स्वतः ही निवडणूक लढवणार नाही. स्वतःचा पक्ष की अपक्ष हे अजून ठरलं नाही. मी सर्व मतदारसंघात जाणार आहे. अशी रोखठोक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.