मुंबई : “पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची BMC निवडणूक घ्या आणि एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या ! ” असा टोला उद्धव ठाकरे Udhhav Thackrey यांनी भाजपला BJP लगावला. पाच राज्यांच्या निवडणूक निकालावर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी सवांद साधला. यावर भाजपने देखील आता उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. भाजपने आपल्या अधिकृत एक्स अकाउंट वरून उद्धव ठाकरे यांच्यावर कडवट टीका करताना म्हटले आहे की, “उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्वाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत. राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे. राम मंदिराच्या मुद्द्यांवर मंदिर वही बनाऐंगे लेकीन तारीख नहीं बताऐंगे अशी टीका तुम्हीच केली होती. पण आता 22 जानेवारी रोजी मंदिराचं लोकार्पण होतंय. त्यामुळे तुमच्या पोटात गोळा उठला आहे. कर्नाटक, तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आणि राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजप जिंकली की इव्हीएमवर शंका. उद्धव ठाकरे किती रडारड करणार ?“
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवल आहे. यानंतर विरोधकांनी शंका कुशंका उत्पन्न केल्याच आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी थेट भाजपला आव्हान दिले की, “दम असेल तर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घ्या, आणि एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या… तुमच्यात आत्मविश्वास असेल तर लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा…!” असं आव्हान देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं.
यावर भाजपने देखील उद्धव ठाकरेंना प्रतिप्रश्न केला आहे. “कर्नाटक, तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आणि राजस्थान छत्तीसगड, मध्यप्रदेशमध्ये भाजप जिंकली की ईव्हीएमवर शंका ? उद्धव ठाकरे किती रडारड करणार ? “असा थेट केला भाजपने लगावला आहे.