पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी Pune Lok Sabha Elections महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसकडून अखेर रवींद्र धंगेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. रवींद्र धंगेकर हे पुन्हा एकदा आता भाजपसाठी तगडे आव्हान उभे करू शकतात अशी चर्चा आता पुण्यात सुरू आहे. रवींद्र धंगेकर
कसबा पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांना धूळ चेतवली होती. महाविकास आघाडीच्या वतीने आता लोकसभेसाठी अनेक जण इच्छुक होते. ही रस्सीखेच आता संपली आहे. धंगेकरांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असतानाच गुरुवारी उशिरा काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी घोषित केली आहे.
पुण्यातून महायुतीच्या वतीने भाजपचे मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुरलीधर मोहोळ यांची देखील पुण्यातून मोर्चे बांधणी तगडी आहे. त्याचबरोबर आता रवींद्र धंगेकर हे देखील अधिकृतरित्या मैदानात उतरले आहेत. त्यासोबतच वसंत मोरे यांनी देखील एल्गार पुकारला आहे. त्यामुळे आता पुण्यामध्ये ही तिहेरी लढत होणार आहे.