महाराष्ट्र : सध्या लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections 2024 पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अनेक पेच प्रश्न निर्माण झाले आहेत. सत्ताधाऱ्यांमध्ये भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट, आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिघांमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. तर नेमका कोणत्या जागेवर कोण दावा सांगते आणि कोणाला किती जागा मिळू शकतात हे पाहूयात…
- महाराष्ट्र लोकसभेसाठी एकूण 48 मतदार संघामध्ये ही निवडणूक होणार आहे.
- 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत या 48 मतदारसंघांपैकी कोणाला किती जागा मिळाल्या होत्या
* भाजप 23 जागांवर विजयी
* शिवसेना 18 जागांवर विजयी
* राष्ट्रवादी काँग्रेस चार जागांवर विजय
* काँग्रेसला 1 जागा एआयएमआयएम 1 आणि अपक्ष 1 असे इतर तीन जागांचे विभाजन झाले होते.
- त्यानंतर महाराष्ट्रमध्ये सत्ता परिवर्तन झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर दोन्हीही पक्षांचे गट पडले. यामध्ये शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 13 खासदार शिंदे गटामध्ये सामील झाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 खासदार यांपैकी एक खासदार अजित पवार गटामध्ये सामील झाला आहे.
- आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी जागा वाटपाबाबत आपली भूमिका मांडली आहे.
- यामध्ये शिवसेनेने 22 जागांवर दावा सांगितला आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसने 12 जागांवर दावा सांगितला आहे.
- भाजप 32 जागांवर आपला दावा करत आहे.
एकंदरीतच आता हा मोठा पेच प्रसंग भाजपा समोर उपस्थित झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जागावाटपाबाबत महत्त्वाची चर्चा केली. तर आता भाजपचे प्रमुख नेते हे दिल्लीमध्ये महत्त्वाच्या बैठकीसाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसातच जागा वाटपाचा हा तिढा सुटू शकतो अशी शक्यता आहे.
महायुतीमधील मुख्य घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला 12 जागा मिळणार
दरम्यान आता महायुती मधील मुख्य घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीसाठी बारामती सह 12 जागा मिळणार असल्याची माहिती मिळते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी इच्छुकांची बैठक घेऊन चर्चा केली आहे.
तुला नक्की पाडणार ! पुण्यात भाजपतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; पुणे महापालिकेत मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात पोस्टरबाजी