धाराशिव : अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये धाराशिव लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत तिढा सुटता सुटत नव्हता. अखेर हा तिढा आता सुटला असल्याचं सूत्रांनी सांगितल आहे. आज भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील BJP MLA Rana Jagjit Singh Patil यांच्या पत्नी अर्चना पाटील Archana Patil या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. आणि आजच त्यांना धाराशिव लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.
अनेक दिवसांपासून धाराशिवच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. महाविकास आघाडी कडून ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ही जागा ओमराजे निंबाळकर यांना देण्यात आली आहे. तर महायुतीच्या वतीने धाराशिवसाठी अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा काही वेळातच होऊ शकते अशी माहिती मिळते आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी खरतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी बरीच ताकद लावली होती. सावंत यांना त्यांचे पुतळे धनंजय सावंत यांना लोकसभेसाठी मैदानात उतरवायचे होते. परंतु आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे प्रयत्न कमी पडले आहेत. आणि भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना आता महायुतीच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे असं समजतं आहे. त्यामुळे धाराशिवमधून आता महाविकास आघाडी कडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर तर महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अर्चना पाटील अशी लढत होऊ शकते.