लोकसभा निवडणूक : लोकसभा निवडणूक 2024 Lok Sabha Elections 2024 च्या सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 58 जागांसाठी मतदान पार पडते आहे. सहाव्या टप्प्यासाठी एकूण 889 उमेदवार रिंगणात आहेत.
- उत्तर प्रदेशातील 14
- पश्चिम बंगालमधील 8
- जम्मू-काश्मीरमधील 8
- झारखंडमधील 8
- ओडिशातील 6
- जम्मू-काश्मीरमधील 1 जागेसाठी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान पार पडते आहे. देशात तापमानाचा मोठा फटका बसतो आहे. तरीही मतदान कारण्यासाठी नागरिक मतदान केंद्रावर पोहोचत आहेत.
दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ” मी जनतेला आवाहन करू इच्छितो की, त्यांनी मतदान करावे, मतदानाचा हक्क बजावावा. हुकूमशाही, महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात मोठ्या संख्येने लोक मतदान करत आहेत, असे मला वाटते.” असे अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत
लोकसभा निवडणूक 2024 च्या सहाव्या टप्प्यातील मतदान देशातील आठ राज्यांमध्ये सुरू आहे. कडक उन्हातही लोक उत्साहाने मतदानाचा हक्क बजावत आहेत. दुपारी 3 वाजेपर्यंत देशात 49.20 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यनिहाय मतदानाची टक्केवारी
उत्तर प्रदेश ४३.९५
ओडिशा ४८.४४
जम्मू-काश्मीर ४४.४१
झारखंड ५४.३४
पश्चिम बंगाल ७०.१९
बिहार ४५.२१
दिल्ली NCR ४४.५८
हरियाणा ४६.२६