मुंबई : लोकसभा निवडणुकीची 19 एप्रिल रोजी पहिली मतदान प्रक्रिया पार पडली आहे. एकीकडे पहिला टप्पा पार पडला असला तरीही दुसरीकडे महायुतीतील जागा वाटपावरून वादंग सुरू आहेत. राजकीय अंतर्गत घडामोडींबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर नाराज असल्याची माहिती मिळते आहे.
19 एप्रिलला नाशिक बाबतचा महायुतीतील तिढा सुटला असं दिसून येत होतं. मंत्री छगन भुजबळ हे नाशिकच्या जागेसाठी प्रचंड आग्रही होते. परंतु त्यांनी स्वतःहून माघार घेतल्याने आता या जागेवर नेमका कोणता उमेदवार दिला जाणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष होतं. एकीकडे निवडूणुकीची मतदान प्रक्रिया सुरू होऊन देखील नाशिकचा उमेदवार निश्चित झालेला नाही. महाआघाडीचा उमेदवार यांनी प्रचाराला यापूर्वीच सुरुवात केली आहे. तीन आठवडे उलटून गेले तरी अद्याप उमेदवार निश्चित न झाल्याने आणि सातारा नाशिक गडचिरोली परभणी या जागांवर चांगले उमेदवार असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसला जागा न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट अजित पवारांवर नाराज असल्याचं बोललं जात आहे.
साताऱ्याची जागा ही सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचं निश्चित झालं होतं. जागा वाटपात ही गोष्ट ठरल्यानंतर देखील भाजपने ही जागा उदयनराजेंना घोषित केली. भाजपच्या आणि शिवसेनेच्या दबावाला न जुमानता निवडून येणाऱ्या जागा हातातून गेल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असल्याकारणानेच अजित पवारांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस सहा मोठा गट नाराज आहे.