महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections मतदानाचा आज शेवटचा म्हणजेच पाचवा टप्पा आहे. पाचव्या टप्प्यामध्ये मुंबईतील सहा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याचबरोबर धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील 13 जागांवर सकाळी 11 वाजेपर्यंत 15.93 टक्के मतदान पार पडले आहे. दिंडोरीत सर्वाधिक 19.50 टक्के मतदान झाले आहे. तर कल्याणमध्ये मतदारांचा संथ प्रतिसाद दिसून येतो आहे.
महाराष्ट्र सरासरी – 15.93 टक्के
- भिवंडी – 14.79
- धुळे – 17.38
- दिंडोरी – 19.50
- कल्याण – 11.46
- उत्तर मुंबई – 14.71
- उत्तर मध्य मुंबई – 15.73
- उत्तर पूर्व मुंबई – 17.01
- उत्तर पश्चिम मुंबई – 17.53
- दक्षिण मुंबई – 12.75
- दक्षिण मध्य मुंबई – 16.69
- नाशिक – 16.30
- पालघर – 18.60
- ठाणे – 14.86
मोठी बातमी : लोकसभा निवडणुक मतदानाचा आज पाचवा टप्पा; मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला
महाराष्ट्रात अशी होणार लढत
- मुंबई उत्तरः पीयूष गोयल (भाजप) विरुद्ध भूषण पाटील (काँग्रेस)
- मुंबई उत्तर मध्य: उज्ज्वल निकम (भाजप) विरुद्ध वर्षा गायकवाड (काँग्रेस)
- मुंबई दक्षिणः अरविंद सावंत (शिवसेना उबाठा) विरुद्ध यामिनी जाधव (शिवसेना)
- मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे (शिवसेना) विरुद्ध अनिल देसाई (शिवसेना उबाठा)
- मुंबई उत्तर-पश्चिम: रवींद्र वायकर (शिवसेना) विरुद्ध अमोल कीर्तिकर (शिवसेना उबाठा)
- मुंबई ईशान्य: संजय दिना पाटील (शिवसेना उबाठा) विरुद्ध मिहीर कोटेचा (भाजप)
- कल्याण : वैशाली दरेकर-राणे (शिवसेना उबाठा) विरुद्ध डॉ.श्रीकांत शिंदे (शिवसेना)
- ठाणे : राजन बाबुराव विचारे (शिवसेना उबाठा) विरुद्ध नरेश म्हस्के (शिवसेना)
- भिवंडी : कपिल मोरेश्वर पाटील (भाजप) विरुद्ध सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी)
- पालघर: हेमंत सवरा (भाजप) विरुद्ध भारती कामडी (शिवसेना उबाठा)
- धुळे : भामरे सुभाष रामराव (भाजप) विरुद्ध शोभा दिनेश (काँग्रेस)
- दिंडोरी : भास्कर मुरलीधर भगरे (शरद पवार गट) विरुद्ध डॉ. भारती प्रवीण पवार (भाजप)
- नाशिक : हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना) विरुद्ध राजाभाऊ वाजे (शिवसेना उबाठा)