मुंबई : आमदार राम कदम यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून अयोध्येतील राम मंदिरातील प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी २२ जानेवारीला महाराष्ट्रात दारू आणि मासबंदी व्हावी असे आवाहन केले होते. यावर आमदार राम कदम यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटले आहे. काल राम कदम यांच्या या पत्रावरून जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करत म्हटले होते की, राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, आपण अनेक इतिहास लक्षात ठेवत नाही, वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. 14 वर्ष जंगलात असणारे राम शिकार करायचे असे वक्तव्यही जितेंद्र आव्हाड यांनी केलं.
जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे दरम्यान ठीक ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त होत असताना स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांसमोर येऊन महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली आहे ते म्हणाले की, “मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचं विकृतीकरण करणं माझं काम नाही. पण मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो. राम, प्रभू श्रीराम, ज्याला आम्ही महाराष्ट्रात पांडुरंग हरी म्हणतो. त्या रामाबद्दल बोलताना मी म्हणालो की, ते मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाही.”
“मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचं विकृतीकरण करणं माझं काम नाही. पण मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो. राम, प्रभू श्रीराम, ज्याला आम्ही महाराष्ट्रात पांडुरंग हरी म्हणतो. त्या रामाबद्दल बोलताना मी म्हणालो की, ते मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाही. पण जे याविरोधात उभे राहिले आहेत त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो, वाल्मिकी रामायणामध्ये सहा स्कंद आहेत. त्यातील अयोध्ये स्कंदेतील 52 श्लोक 102 जो आहे तो मी वाचून दाखवत नाही, कारण मला वाद वाढवायचा नाही.”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.