मुंबई : मंगळवारी राजकीय वर्तुळात आणखीन एक नवीन गदारोळ झाला तो राष्ट्रवादीच्या नाव आणि पक्ष चिन्हावरून ! निवडणूक आयोगाने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना दिल्याचे घोषित केले. त्यामुळे आता शरद पवार यांच्या पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह काय असणार याबाबत उत्सुकता असतानाच महत्त्वाची बातमी समोर येते आहे. शरद पवार गटाला आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) हे नाव मिळालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह हे अजित पवारांना दिल गेलं. त्यानंतर शरद पवार यांना आज दुपारी चार वाजेपर्यंत पक्षाचे नाव आणि चिन्ह संदर्भात अर्ज करण्याची मुदत निवडणूक आयोगाने दिली होती. त्यानुसार शरद पवार गटाकडून ‘राष्ट्रवादी शरद पवार’, ‘मी राष्ट्रवादी’ आणि ‘शरद पवार स्वाभिमानी पक्ष’ हे तीन पर्याय निवडणूक आयोगाकडे सोपवले होते असे समजते. तर आता शरद पवार गटाला आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) हे नाव मिळालं आहे. नाव ठरले असले तरी पक्षाचे चिन्ह कोणते असणार यावर मात्र अजून माहिती स्पष्ट मिळालेली नाही.