अयोध्या : लोकसभा निवडणूक 2024 Lok Sabha Elections 2024 भाजपसाठी BJP दणका देणारी ठरली आहे. 2014 आणि 2019 मध्ये मोदी लाटेन देशाला अक्षरशः झोडपून काढलं होतं. खरं तर 2024 च्या निवडणुकांमध्ये देखील थेट 400 पारचा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांनी दिला होता. पण ज्या राम मंदिराचा अजेंडा घेऊन ही निवडणूक लढण्यात आली होती त्या अयोध्यामध्ये Ayodhya देखील भाजपला हार पत्करवी लागली आहे.
लोकसभा निवडणुकीचे आजचे निकाल हे नक्कीच धक्कादायक आहेत. फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार लल्लु सिंह यांचा 45 हजार मतांनी पराभव करण्यात आला आहे. समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद हे आयोध्येतून निवडून आले आहेत.
अयोध्येमध्ये 2014 आणि 2019 मध्ये लल्लू सिंह हे विजयी झाले होते. त्यामुळे भाजपने विद्यमान खासदार म्हणून त्यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली. परंतु या निवडणुकांमध्ये अवधेश प्रसाद यांनी तब्बल 45000 पेक्षा अधिक मतांनी त्यांचा पराभव केला आहे.
SHARAD PAWAR : शरद पवारांची महत्त्वाची पत्रकार परिषद : ” देशाचा निकाल परिवर्तनाला पोषक, पुढची दिशा इंडिया आघाडीच्या बैठकीत ठरणार ! ” नेमकं काय म्हणाले