मुंबई : यंदाची लोकसभा निवडणुक Lok Sabha Election 2024 चांगलीच गाजली आहे. आता देशभरामध्ये मतदानाचे सर्व टप्पे पार पडले आहेत. तर उद्या चार जून रोजी सर्वांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. निकालाला आता अवघे काही तास शिल्लक असताना मात्र निवडणूक आयोगाने Election Commission पत्रकार परिषद Press Conference घेऊन उद्धव ठाकरेंवर Uddhav Thackrey कारवाईचे आदेश दिल्याची माहिती दिली असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये मुंबईतील सहा जागांसाठी 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान याच दिवशी मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच सायंकाळी पाच वाजता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते.
मोठी बातमी : निकालाच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद; नेमका विषय काय ?
20 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. ते म्हणाले होते की, ” मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडले. पण निवडणूक यंत्रणा कमी पडली. निवडणूक आयोगाकडून मुद्दाम ज्या ठिकाणी ठाकरे गटाला किंवा महाविकास आघाडीला जास्त मतदान होऊ शकतं तिथे मतदानासाठी मुद्दाम जास्त वेळ लावला जातोय. निवडणूक आयोगाच्या दिरंगाईमुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. अखेर कंटाळून अनेक मतदारांनी रांगेतून बाहेर पडत मतदान न करण्याचा निर्णय घेतला.” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता.
यावरच आता निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.