मुंबई : मुंबईमध्ये Mumbai Crime एक विचित्र घटना समोर आली आहे. विचित्र यासाठी की केवळ, ” पाणी कपात आहे. आज आंघोळ करू नका..!” असं बायकोने नवऱ्याला सुचवलं आणि बायकोच्या या सूचनेचा नवऱ्याला एवढा राग आला की त्याने थेट घरातील चाकू घेऊन तिच्या पोटावर सपासप वार केले आहेत. या घटनेमध्ये ही महिला गंभीर जखमी झाली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पाणी कपातीचे सध्या मोठे संकट आहे. अनेक ठिकाणी तर महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. दरम्यान मुंबई मधल्या या पाणी कपातीमुळे आज एका महिलेला आपला जीव गमवण्याची वेळ आली होती. नेमकं घडलं असं की साकीनाका परिसरामध्ये राहणारं हे जोडपं आहे. यामध्ये आरोपी पती परमात्मा गुप्ता (वय वर्ष 42) याने आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला आहे.
शनिवारी दुपारी परमात्मा गुप्ता हे घरी आले. त्यांना घरी आल्यानंतर आंघोळ करायची होती. पण पत्नीने पाणी कपात आहे आणि घरामध्ये पाणी कमी आहे असं कारण देऊन अंघोळ करू नका अशी सूचना केली आणि या सूचनेचा पतीला एवढा राग आला की त्यांनी थेट घरातील चाकू घेऊन मीरा गुप्ता यांच्या पोटावर सपासप वार केले. सुदैवानं या घटनेमध्ये मीरा गुप्ता यांचा जीव वाचला आहे. पण या हल्ल्यांमध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान पती परमात्मा गुप्ता यांच्यावर साकीनाका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय.