कोल्हापूर : महाराष्ट्रात पाऊल ठेवताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने कांदा उत्पादकांना बाहेरच्या देशात कांदा निर्यात करण्यावर लावलेली बंदी आता उठवण्यात आली आहे. त्यामुळे सहा देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार आहे.
केंद्र सरकारने सहा देशातून बंदी उठवली असून यामध्ये बांगलादेश, युएइ, भूतान, बहारीन, मॉरिशस आणि श्रीलंका या देशात आता भारताचा कांदा निर्यात होण्यावर केंद्राने हिरवा कंदील दिला आहे. केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला असून 99 150 मॅट्रिक टन कांदा शेतकऱ्यांना निर्यात करता येऊ शकतो.
Deputy CM Ajit Pawar : .”..तर 2029 मध्ये पुन्हा मतं मागायला येणार नाही !” अजित पवारांचे थेट आव्हान
ही निर्यात बंदी उठवल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कांदा निर्यात करता येऊ शकल्याने आता कांद्याला देखील चांगला दर मिळू शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आसमानी संकट, शेतमालाला मिळणारी किंमत यामुळे खचला होता. आज या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून उद्या त्यांची कोल्हापूरमध्ये सभा पार पडणार आहे.