पुणे : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections 2024 पार्श्वभूमीवर आज चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. तीन टप्प्यातील निवडणुका पार पडल्या आहेत. यामध्ये तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक गाजली. राजकीय आणि गुन्हेगारी जगतातील घटनांमुळे तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीला गालबोट लागलं. तर आता चौथा टप्प्यातील निवडणुकीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
https://www.facebook.com/share/v/zPC647wnm8rC44i2/?mibextid=qi2Omg
चौथ्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये अर्थात 13 मे ला नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी या अकरा मतदार संघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. सायंकाळी सहानंतर प्रचाराची सांगता केली जाईल.
दरम्यान १३ मे ला पुण्यातील लोकसभा मतदार संघासाठीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी पुण्यामध्ये तळ ठोकून आहेत. काल रात्री उशिरापर्यंत महत्त्वाच्या बैठका पार पडल्या आहेत. त्याचबरोबर आज दुपारपर्यंत देखील बैठका पार पडणार असून सायंकाळी पाच वाजता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील गोखले नगरमध्ये सांगता सभा घेणार आहेत.
https://www.facebook.com/share/v/QwKKqMPAdxeu6HiL/?mibextid=jmPrMh