उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या सीतापुर येथून अत्यंत धक्कादायक आणि मन हे लावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. व्यसनी मुलान त्याची जन्मदात्री आई ,पत्नी आणि तीन मुलांना निर्दयीपणे संपवल Murder Case आहे. त्याचबरोबर स्वतः देखील आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, आरोपी अनुराग याला दारूचे प्रचंड व्यसन होतं. त्यातूनच तो अविचारी बनला होता. त्याच्या वागण्या बोलण्यामुळे व्यसनमुक्ती केंद्रात त्याला दाखल करण्याचा प्रयत्न कुटुंबीय करत होत. यावरूनच त्या रात्री घरात प्रचंड भांडण झालं. पहाटेच्या सुमारास घरातून मोठमोठ्याने आवाज आल्याने शेजाऱ्यांनी घराच्या दिशेने धाव घेतली. परंतु जे समोर दिसलं ते अत्यंत दुर्दैवी होतं.
45 वर्षे अनुराग सिंह यांन त्याची आई सावित्री (वय वर्ष 65), पत्नी आणि तीन मुलं यांची निर्दयीपणे हत्या केली होती. आणि त्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. तशी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. सध्या पोलीस फॉरेन्सिक टीम या हत्याकांडाचा तपास करत आहेत.