बीड : बीडमध्ये अजूनही वातावरण तापलेले आहे. लोकसभा निवडणुकीचा Lok Sabha Election निकाल लागून बराच कालावधी लुटला आहे परंतु बीड Beed लोकसभा मतदारसंघातील धक्कादायक निकालानंतर सोशल मीडियावर पंकजा मुंडे Pankaja Munde यांच्या बाबत करण्यात आलेल्या त्या पोस्टवरून मराठवाड्यामध्ये मात्र वनवा पेटलेला आहे.
नेमकं काय घडलं
बीड लोकसभा मतदार संघामध्ये या पंचवार्षिकसाठी महायुतीकडून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यामध्ये प्रचंड चुरशीची लढत झाल्याचं पाहायला मिळालं. वास्तविक पाहता पंकजा मुंडे यांचा या मतदारसंघातील दबदबा आणि अनुभव पाहता मुंडे यांचा विजय निश्चित मानला जात होता. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. एकीकडे हा पराभव पचवून पंकजा मुंडे यांच्यासह भाजपला देखील कठीण जात असताना मुंडेंबाबत सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली. त्यानंतर प्रचंड प्रमाणात वातावरण चिघळले आणि पाथर्डी बंदची हाक देण्यात आली होती.
सोशल मीडियावर एका युजरने पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर काही जण नाचत जल्लोष करत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. आणि त्यामध्ये त्यांनी आक्षेपार्ह मजकूर देखील कॅप्शनमध्ये लिहिला होता. यानंतर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी या युजरच्या थेट घरी जाऊन राडा केला. यानंतर जे वातावरण ढवळले गेले ते आता पाथर्डी बंद नंतर शिरूर, परळी, वडवणी गाव बंद पर्यंत पोहोचले होते. तर आता सिरसाळा शहर बंदची देखील हाक देण्यात आली आहे.