मुंबई : शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द केली आहे. आजच्या दिवसातील दुसरी मोठी राजकीय घटना आहे.
नेमकं काय घडलं
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा मतदार संघाची उमेदवारी मंगलदास बांदल यांना दिली होती. दरम्यान बारामतीमध्ये वंचित बहुजन आघाडी ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देणार असे वंचित ने घोषित केले आहे. असे असताना देखील इंदापूरमध्ये दशरथ मानेंच्या घरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली होती. त्यावेळी मंगलदास बांदल हे त्या ठिकाणी उपस्थित होते. यावरून आज प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार बांधली यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे.
- वंचितने शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मंगलदास बांदल यांची उमेदवारी घेतली मागे.
- बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने हा निर्णय वंचितने घेतला.
- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला होता.
- पक्षाच्या या निर्णयाविरोधात गेल्याने मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात येत असल्याची घोषणा वंचितने आली आहे.
- इंदापूरमध्ये दशरथ मानेंच्या घरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली असता त्या ठिकाणी मंगलदास बांदल हेदेखील उपस्थित होते.
- त्यावरून वंचितवर मोठी टीका होत होती.
- त्याची दखल घेऊन वंचितने आता मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी रद्द करण्यात आली.