नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका Lok Sabha Election 2024 पार पडल्यानंतर भाजपला BJP महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये नेमका एवढा मोठा पराभव का स्वीकारावा लागला यावर सध्या भाजपचे आत्मचिंतन सुरू आहे. आज महत्त्वाची बैठक पार पडली असून यामध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या वतीने कोअर कमिटीला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
” कोण्या एका व्यक्तीच्या मर्जीने महाराष्ट्रात पक्ष चालू शकत नाही. कोअर कमिटीला सोबत घेऊनच पक्ष चालवावा लागणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला थांबावायचं असेल तर भाजपने एकत्रितपणे काम करायला हवं. महाराष्ट्रातील भाजपच्या सर्वच जुन्या नेत्यांनी सक्रिय व्हायला हवं. ” असा आदेश आता केंद्र महाराष्ट्राला दिला आहे.
महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांची दिल्लीमध्ये मंगळवारी बैठक पार पडली. लोकसभा निवडणुका तर पार पडल्या आहेत, पण आता विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित करण्याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे. दरम्यान सोशल मीडियावर लक्ष केंद्रित करा, सोशल मीडियावर भाजपच्या विरोधात जे काही प्रचार करण्यात आले त्याला उत्तर देण्यासाठी भाजपचा सोशल मीडिया कमी पडला असा थेट आरोप देखील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियाचा प्रभावी उपयोग करा. यासह महाराष्ट्रातील नेतृत्वात कोणताही बदल होणार नसून भाजपने आता दोन केंद्रीय मंत्र्यांची महाराष्ट्रावर वॉच ठेवण्यासाठी नियुक्ती केली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विन वैष्णव हे दोघेजण महाराष्ट्रावर वॉच ठेवणार आहेत.
Sanjay Raut : छगन भुजबळ हाती मशाल घेणार ? ” भुजबळांनी स्वतःचा मार्ग निवडला आहे..!” संजय राऊत यांनी स्पष्टच सांगून टाकले…