मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार Ajit Pawar गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ Chagan bhujbal हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही असलेले छगन भुजबळ यांना डावलण्यात आले. लोकसभेतून अखेर त्यांनी स्वतःच माघार घेतली. सातत्याने महायुतीच्या विरोधात केली जाणारी वक्तव्य यामुळे छगन भुजबळ हे सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.
काय म्हणाले संजय राऊत
दरम्यान आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद मुंबईमध्ये पार पडली आहे. यावेळी संजय राऊत यांनी स्पष्ट या विषयांवर पूर्णविराम दिला आहे ते म्हणाले की, ” छगन भुजबळ एकेकाळी शिवसेनेत होते. त्याला बराच काळ उलटला. त्यानंतर छगन भुजबळ काँग्रेसमध्ये, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि आता अजितदादा गटात आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासात शिवसेनेचे वळण बरेच मागे पडले आहे. त्यामुळे आपण बोलताय त्या अफवेत तथ्य नाही. छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणताही राजकीय संवाद झालेला नाही, तो होण्याची शक्यता नाही. कारण भुजबळांनी स्वत:चा मार्ग निवडला आहे. त्यांच्या आताच्या भूमिकांशी शिवसेनेच्या भूमिका मेळ खाणार नाहीत. ते शिवसेनेत येणार अशा बातम्या उडवून महाराष्ट्रात गोंधळ उडवला जात आहे. पण छगन भुजबळ यांना शिवसेनेचा कोणताही नेता भेटलेला नाही, भेटणारही नाही. ” असे संजय राऊत म्हणाले आहेत.
काय म्हणाले मंत्री छगन भुजबळ
माध्यमांशी संवाद साधत असताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले होते की, ” मी दादांसोबत नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे. त्यांच्या या वक्तव्यातून मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला असल्याकारणाने राजकीय वर्तुळात आता छगन भुजबळ नेमके कोणत्या पक्षात जाणार अशा चर्चेला उधाण आले आहे.