महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा आज शेवटचा म्हणजेच पाचवा टप्पा आहे. पाचव्या टप्प्यामध्ये मुंबईतील सहा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याचबरोबर धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात 13 मतदारसंघांमध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत 6.33 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान मुंबई मधील सहा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया आज पार पडते असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असल्याचा देखील दिसून येते आहे.
आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मतदानासाठी ठाण्याच्या पाचपाखाडी मतदान केंद्रावर पोहोचले.
पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
धुळे- ६.९२ टक्के
दिंडोरी- ६.४० टक्के
नाशिक – ६.४५ टक्के
पालघर- ७.९५ टक्के
भिवंडी- ४.८६ टक्के
कल्याण – ५.३९ टक्के
ठाणे – ५.६७ टक्के
मुंबई उत्तर – ६.१९ टक्के
मुंबई उत्तर – पश्चिम – ६.८७ टक्के
मुंबई उत्तर – पूर्व – ६.८३ टक्के
मुंबई उत्तर – मध्य – ६.०१ टक्के
मुंबई दक्षिण – मध्य- ७.७९ टक्के
मुंबई दक्षिण – ५.३४ टक्के
महाराष्ट्रात अशी होणार लढत
- मुंबई उत्तरः पीयूष गोयल (भाजप) विरुद्ध भूषण पाटील (काँग्रेस)
- मुंबई उत्तर मध्य: उज्ज्वल निकम (भाजप) विरुद्ध वर्षा गायकवाड (काँग्रेस)
- मुंबई दक्षिणः अरविंद सावंत (शिवसेना उबाठा) विरुद्ध यामिनी जाधव (शिवसेना)
- मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे (शिवसेना) विरुद्ध अनिल देसाई (शिवसेना उबाठा)
- मुंबई उत्तर-पश्चिम: रवींद्र वायकर (शिवसेना) विरुद्ध अमोल कीर्तिकर (शिवसेना उबाठा)
- मुंबई ईशान्य: संजय दिना पाटील (शिवसेना उबाठा) विरुद्ध मिहीर कोटेचा (भाजप)
- कल्याण : वैशाली दरेकर-राणे (शिवसेना उबाठा) विरुद्ध डॉ.श्रीकांत शिंदे (शिवसेना)
- ठाणे : राजन बाबुराव विचारे (शिवसेना उबाठा) विरुद्ध नरेश म्हस्के (शिवसेना)
- भिवंडी : कपिल मोरेश्वर पाटील (भाजप) विरुद्ध सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी)
- पालघर: हेमंत सवरा (भाजप) विरुद्ध भारती कामडी (शिवसेना उबाठा)
- धुळे : भामरे सुभाष रामराव (भाजप) विरुद्ध शोभा दिनेश (काँग्रेस)
- दिंडोरी : भास्कर मुरलीधर भगरे (शरद पवार गट) विरुद्ध डॉ. भारती प्रवीण पवार (भाजप)
- नाशिक : हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना) विरुद्ध राजाभाऊ वाजे (शिवसेना उबाठा)
राज्यपाल रमेश बैस – रामबाई बैस यांचे द. मुंबईत मतदान
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाअंतर्गत मलबार हिल येथील राजभवन भवन क्लब मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस यांनी देखील मतदान केले.
मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क